पाच जिल्ह्यातील एसपी व्हिजिटवर, अधिकारीही लागले पळू!
कोल्हापूर विभागीय उपायुक्त ऍक्शन मोडवर
कोल्हापूर : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर सध्या ऍक्शन मोडवर असल्याचे दिसत आहे. कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली येथील अधीक्षक कार्यालयांना अचानक भेटी देत एसपीसह सर्वच अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.
चिंचाळकर यांनी कार्यभार घेतल्यानंतर पाचही जिल्ह्यातील एसपी कार्यालयांना भेटी दिल्या. त्यांनी एसपीना तीन ठिकाणी व्हिजिटवर जाण्याचे आदेश दिले. शिवाय निरीक्षक, दुय्यम निरीक्षक यांना त्यांची हद्द सोडून अन्यत्र व्हिजिट देण्याचे आदेश दिले. शिवाय त्याचा अहवालही तातडीने मागवला आहे.
गोव्यातून होणाऱ्या दारू तस्करीला आळा घालण्यासाठी त्यांनी सतर्क राहून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. शिवाय अवैध मद्य विक्री, निर्मिती यावरही कारवाईचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी त्यांनी सांगलीत अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांना व्हिजिटवर पाठवले. उपायुक्तांच्या या अचानक आदेशाने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
एरवी कार्यालयात बसून व्हिजिट केल्याचे कागदोपत्री दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची पळता भुई थोडी झाली आहे. शिवाय अधिकाऱ्यांना विभाग बदलून व्हिजिट करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील अधिकारी आता कार्यालय सोडून फिल्डवर काम करताना दिसत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.