Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली!



ठाणे : खरा पंचनामा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात बीआरएस पक्षाकडुन बॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात बीआरएस पक्षाचे बॅनर लागले आहेत. उल्हासनगरच्या नेताजी चौकात हे बॅनर लावण्यात आले असून विशेष म्हणजे या बॅनरच्या बाजूलाच शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे बॅनर लागलेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात हळूहळू पाय रुजवत आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे राज्यातील मोठ्या पक्षांची काळजी वाढु लागली आहे. पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना सामावून घेणे असा मोठा कार्यक्रमच राव यांनी हाती घेतला असून, त्यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यातही वाढ झाली आहे.

चंद्रशेखर राव यांचा प्रभाव ग्रामीण भागात वाढताना दिसुन येत आहे. ग्रामीण भागाबरोबर आता शहरातही चंद्रशेखर राव यांचे बॅनर लागल्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात राव यांचे बॅनर लागल्याचे दिसुन येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे.

सांगली, सोलापूर, चंद्रपूरसह विविध भागांमध्ये चंद्रशेखर राव यांचे बॅनर्स दिसु लागले आहेत. ठाणे जिल्हातील उल्हासनगर शहरात राव यांचे बॅनर लागले आहेत. के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.