Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वनविभागाला आली जाग : म्हणे गस्त पथकात वाढ करणार! मोर, लांडोर शिकारप्रकरणी तिघांवर गुन्हा

वनविभागाला आली जाग : म्हणे गस्त पथकात वाढ करणार!
मोर, लांडोर शिकारप्रकरणी तिघांवर गुन्हा



सांगली : खरा पंचनामा

शहरातील जुना बुधगाव रस्त्यावरील संभाजी कॉलनी येथे दोन दिवसापुर्वी मोर आणि लांडोरीची शिकार करण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांनी संशय आल्याने पाठलाग करून एका अल्पवयीन मुलाला पकडले. ही घटना वनविभागाला कळवण्यात आली होती. मात्र त्यांचे अधिकारी, कर्मचारी खूपच उशिरा घटनास्थळी पोहोचले. आज मात्र वनविभागाला जाग आली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करत गस्त पथकात वाढ करण्यात येणार असल्याचे या विभागातर्फे सांगण्यात आले.

घटनेनंतर वनविभागाने घटनास्थळी फारच उशिरा येत पंचनामा केला. त्या दोन मृतदेहांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात त्यांची गळा आवळून शिकार झाल्याचे समोर आले. त्यानुसार तिघांवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.

दरम्यान, संरक्षित असलेल्या राष्ट्रीय पक्ष्यांची हत्या झाल्याने शिकारीच्या घटना रोखण्यासाठी गस्ती पथकात वाढ करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. जुना बुधगाव रस्ता परिसरातील वाल्मिकी आवास योजना परिसरालगत संभाजी कॉलनी आहे. याठिकाणी शेतीचा परिसर असल्याने मोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळी एका टोळक्याने एक मोर आणि लांडोर यांची शिकार केली. मृत मोर आणि लांडोरीस पोत्यात भरून ते निघाले होते. त्यावेळी नागरीकांना संशय आला. त्यावेळी शिकाऱ्यांनी पोते टाकून पळ काढला. त्यानंतर नागरिकांनी पाठलाग एकास पकडले. पोते उघडल्यानंतर मोराची शिकार झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्राणिमित्रांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी साडेबाराच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर पोलिसांसह प्राणीमित्रांनी वनविभागाशी संपर्क साधला. शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनीही संपर्क साधला. परंतू तीन तास उलटले तरी वनविभाग कोणी आले नाही. 

कारवाई कुणाची असा प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर अखेर पोलिसांनी प्राणीमित्रांच्या मदतीने राष्ट्रीय पक्ष्यांचे मृतदेह पोलिस वाहनाने वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा केला. वैद्यकीय तपासणीही आज करण्यात आली. त्यात गळा आवळून शिकार झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.