भरधाव कारच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्याचा मृत्यू
कुरुंदवाड : खरा पंचनामा
तेरवाड - हेरवाड रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या एकाचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. आज गुरुवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महादेव चंदर माने (वय ५०, रा. तेरवाड) असे मृताचे नाव आहे. माने हे दररोज सकाळी हेरवाड रस्त्यावर पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जात असतात. नेहमीप्रमाणे आज गुरुवारी पहाटे फिरुन परत येत असताना खुरपे मळ्यानजीक गोव्याहून सांगलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने माने यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये चौघेजण होते. अपघात झाल्यानंतर दोघांना स्थानिक नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कुरुंदवाड पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करून त्यांनी कारचालकाला ताब्यात घेतले. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिसांत झाली आहे. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.