काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतेज पाटील इच्छुक पण...
नवी दिल्ली : खरा पंचनामा
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याची चर्चा आहे. तर आ. बाळासाहेब पाटील आणि आ. सतेज पाटील हेही या पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जन खर्गे यांची भेटही यासंदर्भात घेतली होती. मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा येणार हे जवळपास निश्चित झाले होते. तथापि, अंतिम क्षणी यावर कोणताही निर्णय झाला नाही, असे समजते.
पक्षाने मराठा समाजाच्या मतांऐवजी ओबीसींच्या मतपेढीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असाही एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये दिसून येतो. तथापि, काँग्रेसला सध्याच्या परिस्थितीत मतांच्या गणितापेक्षा पक्ष संघटना भक्कम करायची आहे. हे काम चव्हाण प्रभावीरीत्या करू शकतात, असे मानले जाते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागते याकडे राजकीय नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.