Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तलाठी परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात असणार एकच प्रश्नपत्रिका!

तलाठी परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात असणार एकच प्रश्नपत्रिका!



मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील रिक्त असलेल्या चार हजार 464 तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका न काढता एकच प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे. विशेष म्हणजे एका परीक्षार्थी उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करून परीक्षेमध्ये भाग घेता येणार आहे.

तलाठी संवर्गातील क गटातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास परवानगी दिली आहे. तलाठी भरती संदर्भातील प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. राज्यात एकूण चार हजार 464 तलाठ्यांची पद रिक्त असून, त्यासाठी ही भरती होणार आहे. राज्याच्या जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाने येत्या 20 जूनपासून भरतीसाठी लिंक खुली करण्याची परवानगी शासनाला मागितली आहे. लिंक खुली झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

आजपर्यंतच्या तलाठी भरती परीक्षांमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यंदा भूमी अभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम टीसीएस कंपनीला दिले आहे. तलाठी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरिता अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला असून, संपूर्ण राज्यातील परीक्षार्थीसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.

भरती परीक्षाकरिता लिंक ओपन झाल्यावर नोंदणी करता 21 दिवसांचा मुदत कालावधी असणार आहे. राज्यभरातून किमान पाच लाख विद्यार्थी उमेदवार ही परीक्षा देतील, असा अंदाज आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया करून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दिवशी परीक्षा घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.