काँग्रेसने दिला राष्ट्रवादीला दणका!
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसला भिंवडी येथे मोठा झटका बसला आहे. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा आदेश डावलून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करणारे १८ नगरसेवक सहा वर्षांसाठी अपात्र ठरले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रवादीला चांगलाच दणका दिल्याची चर्चा आहे.
भिवंडीचे माजी महापौर जावेद दळवी यांच्या याचिकेवर नगरविकास विभागाने हा निर्णय दिला आहे. या नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार रिषीका रांका यांच्या विरोधात मतदान केले होते व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाने त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.
या निकालामुळे दलबदलू लोकप्रतिनिधींना चाप बसेल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.