मोरेवाडीत पावणेतीन लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय उपायुक्तांचे पथक, पोलिसांची संयुक्त कारवाई
कोल्हापूर : खरा पंचनामा
करवीर तालुक्यातील मोरेवाडी येथे साठा करून ठेवलेली सुमारे पावणेतीन लाख रूपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाचे उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या भरारी पथकासह पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. दरम्यान छाप्यावेळी दारू साठा करणारा संशयिताने पलायन केल्याचे सांगण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत अरूण पाटील असे संशयिताचे नाव आहे. उपायुक्त चिंचाळकर यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारू साठा, विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांचे भरारी पथक गस्त घालत होते. त्यावेळी करवीर तालुक्यातील मोरेवाडी येथे गोवा बनावटीच्या दारूचा साठा केल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने शनिवारी मोरेवाडी येथे छापा टाकला. त्यावेळी गोवा बनावटीच्या दारूचे ३२ बॉक्स जप्त केले. उपायुक्त चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक पंकज कुंभार, पोलिस निरीक्षक अरविंद काळे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, मुकेश लाडके, पोलिस अंमलदार सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, योगेश शेलार, गणेश सानप, सविता देसाई, अश्विनी मोहिते, दत्ता बांगर, प्रमिला माने यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाला मोरेवाडीचे सरपंच आनंदा कांबळे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश पोवार यांचे सहकार्य लाभले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.