अनिल परब यांची 10 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त!
मुंबई : खरा पंचनामा
ठाकरे गटाचे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल परब यांच्या मालकीची बीच रिसॉर्ट आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील जमीन जप्त केली आहे. ईडीने जप्त केलेल्या संपत्तीची किंमत अंदाजे १०.२ कोटी एवढी आहे, अशी माहिती ईडीने दिली.
ईडीने या वर्षी जानेवारीमध्ये दापोली, रत्नागिरी येथील गट क्रमांक ४४६ च्या जमिनीवर बांधलेले साई रिसॉर्ट एनएक्स जप्त केले होते. हे रिसॉर्ट पर्यावरण (संरक्षण) कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने केला होता. त्यासंबंधी तक्रारही दाखल करण्यात आली होती. सोबतच साई रिसॉर्ट, सी कोंच रिसॉर्ट आणि इतर काही जणांविरुद्ध राज्य पोलिसांनी केलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ईडीने केलेल्या कारवाईची माहिती देतांना म्हटले आहे की, 'अनिल परब आणि त्यांचे जवळचे सहकारी सदानंद कदम यांनी महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ना- विकास क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शेतजमिनीच्या एका भागावर दुमजली बंगला बांधण्यासाठी बेकायदेशीर परवानगी घेतली. आणि या जमिनीवर कोस्टल रिजन झोन नियमांचे उल्लंघन करून तीन मजली साई रिसॉर्ट बांधले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.