Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ग्राहकांची क्रेडिट कार्ड वापरून 13 लाखांना गंडा!

ग्राहकांची क्रेडिट कार्ड वापरून 13 लाखांना गंडा!



मिरज : खरा पंचनामा 

मिरजेतील आयसीआयसीआय बँकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याने ग्राहकांची क्रेडिट कार्ड वापरून 13 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत अशोक कोळी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. संशयिताने बॅंकेतील सुमारे १० ते १५ ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत बॅक व्यवस्थापक विजय पळसुले यांनी महात्मा गांधी चौक पोलिसांत  फिर्याद दिली आहे.

आयसीआयसीआय बँकेत भरत कोळी याने अनेक ग्राहकांना क्रेडिट कार्ड दिले होते. त्यानंतर त्याने अनेकांना मोबाईल वरील ओटीपी घेऊन त्यांच्या क्रेडिट खात्यावरून पैसे काढले. मात्र याबाबत ग्राहकांना माहिती नसल्यामुळे हा प्रकार वारंवार घडत गेला. पैसे भरणे बाबत बँकेतून ग्राहकांना फोन गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. गेल्या काही महिन्यांपासून कोळी फसवणूक करून गायब झाला आहे. याबाबत बँकेत चौकशी केल्यानंतर त्याने फसवणूक केल्याचा प्रकार ग्राहकांना समजला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.