मिरजेत दुचाकी चोरट्यांना अटक : 13 वाहने जप्त
मिरज शहर पोलिसांची कारवाई
मिरज : खरा पंचनामा
जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकी चोरून ते स्वस्तात विक्री करणार्या दोघा चोरट्यांना मिरज शहर पोलिसांनी अटक केली. दोघांकडून 6 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या 13 दुचाकी जप्त केल्या आहेत, अशी माहिती मिरज शहरचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
रणजीत श्रीरंग लोखंडे (वय 25, रा. मल्हारवाडी, मंगसुळी, जि. बेळगाव) आणि संजू आण्णाप्पा वालेकर (वय 26, रा. सावळज, ता.तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हे प्रकटीकरणचे पथक शहरात गस्त घालत असताना म्हैसाळ रस्त्यावर दोघे चोरीची दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला. त्यावेळी त्यांच्याकडे एक दुचाकी मिळून आली.
पथकाने मोटारसाकलबाबत चौकशी केली असता मिरजेतील दत्त मंदीर चौकातून दुचाकी चोरल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडे अधिक तपास केला असल्याने त्यांनी विविध ठिकाणाहून 13 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच त्या दुचाकी स्वस्तात विक्री केल्याची देखील कबुली दिली.
पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, निलेश कदम, पृथ्वीराज कांबळे, सचिन सनदी, गजानन बिरादार, लक्ष्मण कौजलगी, रणजीत जाधव, दिपक परिट, दत्तात्रय फडतारे, श्रीकांत केंगार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
टोकण घेउन मोटारसायकलची विक्री
संशयितांनी विक्री केलेल्या सर्व मोटारसायकल या टोकण रक्कम घेउन विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितांकडून ठराविक रकमेला व्यवहार ठरविण्यात येत होता. त्यानंतर मोटारसायकल देउन काही ठराविक टोकण रक्कम घेण्यात येत होती. व कागदपत्रे नावावर झाल्यावर उर्वरित रक्कम देण्याचा ठराव करण्यात येत होता. परंतु टोकण रक्कम मिळाल्यावर दोघे फरार होत होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.