राज्यातील 17 उपाधीक्षकांच्या बदल्या : 7 निरीक्षकांना पदोन्नती!
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील पोलीस दलातील 17 उपाधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर 7 निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत.
सुशीलकुमार नायक यांची नांदेड येथे, भागवत सोनावणे यांची मुंबई येथे, दिनेश कदम यांची पुणे येथे, अमरावतीचे सचिंद्र शिंदे यांची चांदूर रेल्वेकडे, नवी मुंबईतील अजयकुमार मालवीय यांची देऊळगाव राजा येथे बदली करण्यात आली आहे. गंगापूरचे प्रकाश बेले यांची मुंबई येथे, नागपूरच्या मृदुला दिघे यांची ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.
गोंदियाचे विजय भिसे यांची मुंबई तर नागपूर लोहमार्गचे हेमंत शिंदे यांची नागपूर शहर, नागपूरचे योगेश मोरे यांची पुणे येथे, पुलगावचे संजय पवार यांची कळंब येथे बदली करण्यात आली आहे. नाशिकचे नितीन गोकवे यांची अहमदनगर येथे, मुंबईचे शेखर डोंबे यांची ठाणे येथे, रत्नागिरीच्या संध्या गावडे यांची सावंतवाडी येथे, मुंबईतील गौरीप्रसाद हिरेमठ यांची भूम येथे, संजय कांबळे यांची नाशिक ग्रामीण येथे तर नितीन देशमुख यांची तुळजापूर येथे बदली करण्यात आली आहे.
पदोन्नतीनंतर निरीक्षक सुभाष कोकाटे यांची कोकण विभागात, आनंदा वाघ यांची नाशिक येथे, रवींद्र होवाळे यांची पुणे येथे, युवराज मोहिते यांची पुणे ग्रामीण येथे, दिनेश कटके यांची ठाणे येथे, सुधाकर सुराडकर यांची एसीबी मुंबई येथे, शालिनी शर्मा यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.