2 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार : दि. 17 पासून पावसाळी अधिवेशन!
मुंबई : खरा पंचनामा
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 17 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेश 17 ते 4 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
9 किंवा 10 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. संबंधित मंत्र्यांना त्या-त्या खात्याची माहिती असावी यासाठी आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून, येत्या 9 किंवा 10 जुलैला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत कालच रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची नंदनवन या शासकिय निवास स्थानी बैठक पार पडली. उर्वरित मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्याच आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.