सांगली जिल्ह्यातील 23 पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या!
निरीक्षक डोके यांच्यासह 12 जणांना मुदतवाढ
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक अशा 23 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर 12 अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. 5 अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या अमान्य करण्यात आल्या आहेत. तर चार अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी रात्री उशिरा हे आदेश काढले आहेत.
विट्याचे निरीक्षक संतोष डोके यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आष्ट्याचे निरीक्षक अजित सिद यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. कवठेमहांकाळचे जितेंद्र शहाणे यांची कडेगावला तर नियंत्रण कक्षाकडील सिद्धेश्वर जंगम यांची शिराळा येथे बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले सूरज बिजली यांची संजयनगर येथे तर जोतिराम पाटील यांची जिल्हा विशेष शाखेकडे, संजय हारुगडे यांची सायबर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
एलसीबीचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांची उमदी, गणेश वाघमोडे यांची कुरळप येथे तर उमदीचे पंकज पवार यांची एलसीबीकडे बदली करण्यात आली आहे. महात्मा गांधी चौक ठाण्याचे उपनिरीक्षक कुमार पाटील यांची एलसीबीत बदली करण्यात आली आहे. या चारही बदल्या विनंतीवरून करण्यात आल्या आहेत.
सहायक निरीक्षक यांच्या बदल्यांमध्ये कुरळपचे दीपक जाधव यांची कासेगावला, कासेगावचे अविनाश मते यांची कोकरूडला, सांगली शहरचे समीर ढोरे यांची तासगावला, तासगावचे नितीन केराम यांची सांगली शहरला बदली करण्यात आली आहे. जतचे विनोद कांबळे यांची कवठेमहांकाळ येथे, कवठेमहांकाळचे शिवाजी करे यांची जत येथे, विट्याचे दत्तात्रय कोळेकर यांची इस्लामपूर येथे, इस्लामपूरचे अनिल जाधव यांची विटा येथे बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाकडील सुहास ठोंबरे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
उपनिरीक्षक यांच्या बदलीत सांगली ग्रामीणचे किरण मगदूम यांची विश्रामबाग, सचिन मद्वानां यांची सांगली ग्रामीणकडे, मिरज शहरचे जगन्नाथ पवार यांची सांगली शहरकडे, तासगावचे नामदेव तारडे यांची चिंचणी वांगी येथे, चिंचणी वांगीचे महादेव शिंदे यांची तासगावला बदली करण्यात आली आहे. उपनिरीक्षक मारुती सुळेभावीकर, दीपक माने, रुपाली गायकवाड, श्रीकांत वासुदेव, केशव रणदिवे, प्रमोद खाडे, सागर गायकवाड, नीलम जाधव, संदीप गुरव, जयश्री कांबळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
एक निरीक्षक, 2 सहायक निरीक्षक, 2 उपनिरीक्षक यांच्या विनंतीवरून बदल्या अमान्य करण्यात आल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.