संखमध्ये 24 किलो गांजा जप्त : 3 सख्ख्या भावाना अटक
एलसीबी, उमदी पोलिसांची संयुक्त कारवाई
सांगली : खरा पंचनामा
जत तालुक्यातील संख येथे उसाच्या पिकात लागवड केलेली सव्वा लाख रुपये किमतीची 24 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तीन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. सांगली एलसीबी आणि उमदी पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
राजेंद्र शिवाण्णा बिरादार, श्रीकांत बिरादार, शटगोंडा बिरादार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी अंमली पदार्थ उत्पादन, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जत तालुक्यातील संख येथे 1 एकर उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली.
त्यानंतर एलसीबी आणि उमदी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. त्यावेळी ही झाडे जप्त करून त्याची लागवड करणाऱ्या 3 सख्ख्या भावांना अटक करण्यात आली.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, उमदीचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश खरात, आप्पासाहेब हाके, नितीन पलूसकर, रामराव बनेनवार, संजय पांढरे, प्रशांत माळी, नामदेव काळेल आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.