मुंबईत पुन्हा 26/11 हल्ल्याचा संशय : सुरक्षा वाढवली!
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई पोलिसांनी कुलाब्यातील छाबडा हाऊस इथे सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या छाबडा हाऊसची गुगल इमेज, राजस्थानमध्ये हल्ल्याची योजना आखण्यासाठी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या या माहितीनंतर पोलिसांनी कुलाबा येथील ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा वाढवली आहे. महाराष्ट्र एटीएसने काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडून मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्याकडून छाबडा हाऊसची गुगल इमेज मिळाली आहे. महाराष्ट्र एटीएसनं, मुंबई पोलिसांना माहिती दिल्यानंतर लागलीच या केंद्रावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.