3 लाखांची लाच मागितली : पोलिस निरीक्षकसह तिघांवर गुन्हा!
जळगाव : खरा पंचनामा
5 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 3 लाख रूपये घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खाजगी व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह एका पोलिस अंमलदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड (बाजारपेठ पोलिस स्टेशन, भुसावळ, पोलिस नाईक तुषार पाटील, आणि खाजगी व्यक्ती ऋषी दुर्गादास शुक्ला ( रा. हनुमानवाडी, भुसावळ, जि. जळगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या मित्रास भुसावळ बाजारपेठ येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पोलिस निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड व पोलिस नाईक तुषार पाटील यांच्या सांगण्यानुसार ऋषी शुक्ल याने तक्रारदार यांच्याकडे 5 लाख रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 3 लाख रुपये रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.