सांगलीतील 37 पोलिस अंमलदार यांना पदोन्नती
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील 37 पोलिस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली आहे. 22 हवालदार यांना सहायक उपनिरीक्षकपदी तर 15 पोलिस नाईक यांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी शनिवारी याबाबतचे आदेश दिले आहेत.
सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झालेल्यांमध्ये जितेंद्र जाधव, संभाजी पाटील, नामदेव पाटोळे, सुनील पाटील, अनिल मोहिते, दिनकर चव्हाण, संजय माने, पद्मावती शिंदे, लता गावडे, सुवर्णा गोडबोले आदींचा समावेश आहे.
पोलिस नाईक ते हवालदार पदावर पदोन्नती झालेल्यांमध्ये प्रवीण पाटील, राजेंद्र बाबर, जितेंद्र कदम, वैशाली काळेल, रुपाली देसाई, माणिक पाटील, प्रवीण शिंदे आदींचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.