अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-यास 3 वर्षे सक्तमजूरीची शिक्षा
सांगली : खरा पंचनामा
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला दोषी धरून एकाला 3 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीकडून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केल्यानंतर त्यापैकी 15 हजार रुपये पिडीत मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे.
नितीन आनंदाराव शिंदे ( वय 36, रा. संजयनगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. शहर पोलिस ठाण्याकडे नितीन शिंदे याच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपी विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी दिला. सरकारी पक्षाची बाजू अतिरिक्त जिल्हा सरकार वकील श्रीमती आरती आनंद देशपांडे-साटविलकर यांनी मांडली.
सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी ही तिच्या आईबरोबर शहरातील कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावर अंथरुन, पांघरुन आणि कपडे धुण्यासाठी आलेली होती. त्यावेळी पिडीता ही नदीकाठावर पाण्यात पाय सोडून बसली होती. त्यावेळी आरोपीने तिच्या जवळ जाऊन तुला पोहायला शिकवतो, असे म्हणून तिला पाण्यात ओढून घेतले. त्यानंतर तिच्याशी अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर पिडीतेने हा प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक धनाजी पाटील यांनी केला. खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. सांगली शहर पोलीस ठाण्याकडील हवालदार सीमा धनवडे , पैरवी कक्षातील हवालदार सुनीता आवळे, श्रीमती रेखा खोत यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.