Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि स्वतःसाठी 5 लाखांची लाच मागणारा एएसआय ताब्यात!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि स्वतःसाठी 5 लाखांची लाच मागणारा एएसआय ताब्यात!



सोलापूर : खरा पंचनामा

दाखल असलेल्या तक्रारी अर्जामध्ये तक्रारदार यांना सहकार्य करण्यासाठी तसेच पिकअप गाडी सोडण्याकरिता स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकासाठी 5 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास अॅन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

संजय मनोहर मोरे (वय 57) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्याविरूध्द विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारी अर्जामध्ये तक्रारदार यांना सहकार्य करून त्यामध्ये कोणताही गुन्हा दाखल न करण्याकरिता तसेच विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये जमा करून घेतलेली पिकअप गाडी सोडण्याकरिता सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मोरे यांनी त्यांच्याकरिता तसेच विजापूर नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनपुडे पाटील यांच्याकरिता तक्रारदाराकडे 5 लाखाच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, पहिला हप्ता म्हणून 3 लाख रूपयाची लाच स्विकारण्यास संमती दिल्याप्रकरणी अॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.