Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उद्धव ठाकरे यांच्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले!

उद्धव ठाकरे यांच्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले!



कोल्हापूर : खरा पंचनामा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयापर्यंत गेले होते. मात्र, गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात आवश्यक कागदपत्रेही दिली नाहीत. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. शिंदे-फडणवीस सरकार मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी झटकणार नाही. तोपर्यंत सारथीसारखी संस्था उभारून मराठा समाजातील तरुणांना आर्थिक मदत केली जात असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

ते कोल्हापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरूनच आपला कारभार केला. विखे-पाटील म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सरकार काम करत आहे. तर दुसरीकडे याच समाजातील मुलांना मोठी मदत केली जात आहे.

धनगर समाजाला आरक्षणाचा अधिकार आहे. तो दिला पाहिजे. सरकार आपली जबाबदारी झटकत नाही. शेळी- मेंढी सहकारी महामंडळाच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपये धनगर समाजाला दिले जाणार आहेत. यामुळे धनगर समाज निश्चितपणे स्वयंपूर्ण होणार आहे. विद्यार्थांना शालेय दाखले देण्यात अनेक अडचणी येत आहेत. सर्व्हर डाऊनमुळे त्यांना वेळेत दाखले मिळत नाहीत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.

एकनाथ शिंदे हे सर्वात अपयशी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी टीका केली. याबद्दल बोलताना विखे-पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादीची विचित्र अवस्था झाली आहे. नेत्यांपासून ते खाली कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण काहीही बोलतात. त्यानंतर स्पष्टीकरण देतात. अशी ही राष्ट्रवादीची अवस्था तळ्यात-मळ्यात सुरू आहे. त्यामुळे अजित पवार किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात याला फार महत्त्व नाही, असेही ते म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.