Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विचारांच्या रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन? कोणता पक्ष... कोणता विचार...अन कसली निष्ठा.. रोहित पवार यांची काकांना शालजोडी

विचारांच्या रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन?
कोणता पक्ष... कोणता विचार...अन कसली निष्ठा..
रोहित पवार यांची काकांना शालजोडी



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या झालेल्या राजकीय नाट्यावर अनेक राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत. दिवसभरातील घडामोडीनंतर आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार यांच्यावर कवितेतून जहरी टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट केलेल्या कवितेतून शालजोडीतून अजित पवार यांना चांगलेच टोले लगावले आहेत.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे, आज या दारात... उद्या त्या दारात... पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल
मग लोकांना काय सांगणार?
तोंड कसं दाखवणार?
काल तर कडवा विरोध होता.. ज्या गळाला लागला मासा !
मग आज अचानक गळ्यात गळा कसा? तो कोणता गळ आहे...
तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं? रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं? अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार?
किती दिवस आम्ही हेच ऐकायचं? जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा.. आता कुणाकडून करायची जनतेने आशा?
भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा.. कोणता पक्ष... कोणता विचार.. अन् कसली निष्ठा..
इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा.. कालची भाषा एक होती... आज भलतंच बरळत आहेत...
स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत. कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र... अन् कुठेय
परंपरा?

निर्लज्जपणाचा झाला कळस.....
तुम्हाला येत नाही याची किळस?
मत ज्यांची घ्यायची... त्यांचीच चेष्टा करायची ही कोणती रित?
ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली.. ती देशाला विचार देणारी पिढी आज कुठे हरवली ?

शिव-शाहू-फुले-आंबेडकर... तुम्ही महाराष्ट्र घडवला....
तुमच्या पुरोगामी विचारांच रोपटं इथं रुजवलं.. पण आज याच रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन?
हे होत असेल तर रोखायचं कुणी?
विष पसरवणाऱ्याला थोपवायचं कुणी?

त्यासाठी साहेब....
लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती
आता तुम्हीच उठा...
अन मैदानात उतरा...
शेकडो... हजारो... लाखो... करोडो हात देतील तुम्हाला साथ..
त्यात माझेही असतील दोन हात..

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या या ट्विटमुळे राष्ट्रवादी फोडणाऱ्यांची अनेक प्रकरणे अप्रत्यक्षपणे समोर आल्याची चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.