Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो : पर्यटकांची गर्दी

लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो : पर्यटकांची गर्दी



लोणावळा : खरा पंचनामा

सध्या मान्सूनने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात पर्यटनासाठी अनेकजण उत्सुक असतात. अशाच पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण ओव्हरफ्लो झाले असून याठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.

पावसाळ्यात लोणावळा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी येत असतात. त्यातच गेल्या गेल्या २४ तासांत लोणावळ्यात 158 मिमी पाऊस बरसला आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने आज याठिकाणी असलेले भुशी धरण 'ओव्हरफ्लो' झाले. भुशी डॅमच्या पायऱ्यावरून पाणी वाहत असून परिसरातील धबधबेदेखील वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांची पाऊले लोणावळ्याच्या दिशेने वळू लागली आहेत.

भुशी धरण परिसरात तरुणांपासून ते लहान मुलंही धो धो पावसात आणि धरणाच्या पाण्यात उतरून आपला आनंद लुटत असतात. खास करून पावसाळ्यात याठिकाणी नैसर्गिक दृश्य आणखी खुलून दिसत. भुशी डॅम परिसरात इतकी गर्दी असते कि उभं राहायला सुद्धा कधी कधी जागा मिळत नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.