Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर?

पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर?



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंकजा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्यांनी यासाठी दोनवेळा दिल्ली दौरे केल्याचेही वृत्त आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर आता राज्याच्या राजकारणात आणखी एक स्फोट होण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे भाजपच्या बड्या नेत्या आहेत. त्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पण सध्या त्या नाराज आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा आपली वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

पंकजा मुंडे यांनी काँग्रेस वरिष्ठांच्या घेतलेल्या भेटीला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. पंकजांनी या भेटीत पक्ष प्रवेशाच्या मुद्यावर विस्तृत चर्चा केली. सांगलीच्या एका बड्या नेत्याकडून पंकजा मुंडेंसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.