खाते वाटपाबाबत मध्यरात्री 'वर्षा'वर खलबते!
मुंबई : खरा पंचनामा
अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर कोणला कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत खातेवाटपावर खलबते सुरू होती.
रात्री 11.45 च्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवावस्थानी दाखल झाले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थ, महसूल, सहकार, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा या महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली आहे. त्याला शिंदे गटाचा विरोध असल्याचे समजते. यापार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी बैठकीत चर्चा करण्यात आली. आता खातेवाटपाचा मुहूर्त कधी निघणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.