Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वकिलांच्या वादातून कोर्ट परिसरात गोळीबार!

वकिलांच्या वादातून कोर्ट परिसरात गोळीबार!



दिल्ली : खरा पंचनामा

दिल्लीत तीस हजारी कोर्ट परिसरामध्ये वकिलांमध्ये बाचाबाचीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यामध्ये कुणी जखमी नाही अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकिलांमध्ये काही बाचाबाची झाली त्यानंतर ही घटना घडली आहे.

सध्या या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बार कौन्सिल ऑफ दिल्लीचे अध्यक्ष के ले मनन यांनी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणतात, "या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल. शस्त्रांना परवाना दिला होता की नाही याची चौकशी केली जाईल. शस्त्रे परवाना असतानाही, कोणताही वकील किंवा इतर कोणीही न्यायालयाच्या आवारात किंवा परिसरात त्यांचा वापर करू शकत नाही."

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.