Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कराडच्या पतसंस्थेला पावणेतीन कोटींचा गंडा : सांगलीतील एकाच कुटुंबातील तिघांना अटक

कराडच्या पतसंस्थेला पावणेतीन कोटींचा गंडा : सांगलीतील एकाच कुटुंबातील तिघांना अटक



मिरज : खरा पंचनामा 

जमीनीची बनावट कागदपत्रे सादर करुन कराड येथील जनकल्याण पतसंस्थेला तब्बल दोन कोटी 70 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मुख्य सूत्रधार सुनिल गणेश परांजपे (वय 55) त्याची पत्नी सुचिता सुनिल परांजपे (वय 50), मुलगी पूर्वा सुनिल परांजपे (वय 25 रा. खरे हाैसिंग सोसायटी, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुनिल परांजपे, सुचेता परांजपे व पुर्वा परांजपे या तिघांनी महावीर हुळ्ळे याच्याशी संगनमत करुन जनकल्याण पतसंस्थेला  मिरजेतील सिध्दीविनायक कॅन्सर हॉस्पिटलच्या पाठीमागे जमीन असल्याचे खोटे सांगून पंढरपूर रस्त्यावरील जमीनीची बनावट कागदपत्रे सादर केली. 

त्यानंतर या जमिनीवर पावणेतीन कोटी रुपये कर्ज उचलले. संबंधीतांनी कर्जाची परतफेड केली नसल्याने पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर संबंधीत कर्जदार हे तारण ठेवलेल्या जमीनीचे मुळ मालक नसल्याचे आढळले. सुनिल परांजपे याच्या विश्रामबाग येथील जमिनीवर 75 लाख रुपये कर्जाचा बोजा चढविला असताना दिव्या आहुजा, प्रियदर्शनी वाघ, सच्चानंद आहुजा, महेश ओझा, सचिन दणाणे, आण्णासो चौगुले व सीमा परमार यांनी या मिळकतीची बेकायदा खरेदी व साठेखत केल्याचे आढळले. 

त्यामुळे संबंधीतांनी बोगस जमीनीचे बनावट कागदपत्रे सादर करुन जनकल्याण पतसंस्थेला दोन कोटी, 70 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे लक्षात येताच पतसंस्थेच्या फसवणूकप्रकरणी विनायक कृष्णराव फडके यांनी अॅड. बिल्किस शेख यांच्यामार्फत मिरज न्यायालयात फसवणूकीची फिर्याद दिली. न्यायालयाच्या आदेशाने चार महिन्यापूर्वी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात सुनिल गणेश परांजपे त्याची पत्नी सुचेता सुनिल परांजपे, मुलगी पुर्वा सुनिल परांजपे, महावीर बाबासो हुळ्ळे,यांच्यासह कर्जबोजा असलेली मिळकत विकत घेणार्‍या दिव्या रमेश आहुजा, प्रियदर्शनी अभिषेक वाघ, सच्चानंद आहुजा, सचिन दणाणे, आण्णासो चौगुले, सीमा परमार व उत्तम पाटील अशा  12 जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यांत आला होता. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनिल परांजपे व त्याच्या कुटुंबियांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने पोलिसांनी परांजपे दांपत्यासह मुलीस पुण्यातून अटक केली. परांजपे याचा साथीदार महावीर हुळ्ळे यास न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामिन दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.