किराणा दुकानात चक्क दारूची विक्री : महिलेवर गुन्हा
मंगळवेढा : खरा पंचनामा
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील बबलू किराणा स्टोअर्समध्ये बेकायदा दारू विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून १४०० रुपये किमतीची दारू जप्त करीत दारू विक्रेता महिला रुपाली विजय महानूर (वय ३१) हिच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
तळसंगी येथील बबलू किराणा स्टोअर्समध्ये एक महिला चक्क दुकानात दारू विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच सदर ठिकाणी जावून खात्री केल्यावर रुपाली महानूर हिने पिशवीमध्ये १४०० रुपये किमतीच्या २० देशी संत्रा बाटल्या बेकायदेशीररित्या ठेवून त्याची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.