विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना पर्यावरण दूत पुरस्कार!
सोलापूर विद्यापिठातर्फे सन्मान : सोमवारी होणार वितरण
सोलापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना पयार्वरण दूत-२०२३ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे श्री. फुलारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि पुण्यातील लोक विद्यापीठाच्या हरित मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा पर्यावरण दूत-२०२३ पुरस्कार विशेष महानिरीक्षक श्री. फुलारी यांना जाहीर करण्यात आला आहे. याबाबत सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. डॉ. आर. के. वडजे, हरित मित्र परिवाराचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे यांनी या पुरस्कार निवडीचे पत्र श्री. फुलारी यांना दिले आहे.
आपल्यासारख्या सुविद्य, राष्ट्रहितैषी, पयार्वरण प्रेमीच्या हातून गेल्या अनेक वर्षांपासून तन-मन-धनाने पयार्वरणाचा प्रचार, प्रसार, संवर्धन व जतन करण्याचे पवित्र कार्य, अवितरपणे घडत आहे ते शब्दातीत आहे. आपल्या या सत्कार्याचे फलित म्हणून कृतज्ञतापूर्वक पर्यावरण दूत-२०२३ हा पुरस्कार देताना मनस्वी आनंद होत आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सोमवार दि. २४ जून रोजी दुपारी सोलापूर विद्यापीठाच्या सभागृहात हा पुरस्कार विशेष महानिरीक्षक श्री. फुलारी यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याने श्री. फुलारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.