कोल्हापूर परिक्षेत्रातील ३७ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
रविराज फडणीस, प्रशांत निशानदार यांची कोल्हापूरला बदली, सांगलीत नव्याने पाचजण येणार
सांगली : खरा पंचनामा
कोल्हापूर परिक्षेत्रातील ३७ सहायक पोलिस निरिक्षकांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. एलसीबी, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक रविराज फडणीस, एलसीबीकडील प्रशांत निशानदार यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात नव्याने पाच अधिकारी येणार आहेत. परिक्षेत्रातील ११ अधिकाऱ्यांना मुदतावाढ देण्यात आली आहे. तर विनंतीनुसार आठजणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ९ अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या अमान्य करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोमवारी या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
सांगली एलसीबीत तसेच मिरजेतील महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी रविराज फडणीस यांची तसेच एलसीबीकडील प्रशांत निशानदार यांची विनंतीनुसार कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. सांगलीतील गजानन कांबळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षकांचे वाचक कैलास कोडग यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील भालचंद्र देशमुख यांची कोल्हापूरहून सांगलीला बदली करण्यात आली आहे.
सांगलीतील समाधान बिले यांची सातारा येथे तर सोलापूर ग्रामीणकडील वैभव मारकड यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. सांगलीतील मायादेवी काळगावे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सातारा येथील संदीप मोरे यांची सांगलीला तर कोल्हापूर येथील शिवानंद कुंभार, यांचीही सांगलीला बदली करण्यात आली आहे. सांगलीतील संतोष गोसावी, सुहास ठोंबरे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
विनंतीनुसार केलेल्या बदल्यांमध्ये सांगलीतील सुधीर पाटील यांची सातारा येथे, प्रदीप झालटे यांची सोलापूर ग्रामीण येथे, अविनाश मते यांची सातारा येथे तर शिवाजी करे यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.