डीसीपी शशिकांत बोराटे यांनी केले सराईत गुन्हेगाराला हद्दपार!
पुणे : खरा पंचनामा
लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत केसनंद परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास डीसीपी (पोलिस उपायुक्त) शशिकांत बोराटे यांनी वर्षभरासाठी हद्दपार केले.
सागर कुमार गायकवाड (वय 33, रा. अमर चौक, केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) असे हद्दपार केलेल्याचे नाव आहे. गायकवाड हा केसनंद तसेच आसपासच्या परिसरात दहशत निर्माण करून लोकांना वारंवार त्रास देत होता. त्याच्या दहशतीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्याच्यावर कायद्याचा वचक बसावा म्हणून सहाय्यक लोणीकंद पोलिसांनी त्याला हद्दपार करण्याबाबत पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी प्रस्ताव मंजूर केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.