ही तर आमदार अपात्रतेच्या कारवाईची पूर्वतयारी!
कराड : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदींना सध्या लोकसभा महत्त्वाची असल्याने सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. महाविकास आघाडीतून जे गेले ते गेले. मात्र, महाविकास आघाडीची भीती आजही भाजपला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजे अजित पवारांचा शपथविधी असल्याचे ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला अनेक दिवसांपासून जी शंका होती, ती घटना अखेर आज घडलीच. याचा पहिला अंक आज झाला असून, पुढचे अंक येत्या दोन दिवसांत आपल्याला पाहायला मिळतील. राष्ट्रवादीतील आमदारांवर ईडीची छत्रछाया आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह शिंदे-भाजप गटात गेलेल्यांना चांगली झोप लागावी, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
शिवसेनेत झालेली फूट, या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आहे. या अपात्रतेचा निकाल ९० दिवसांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यावा लागणार आहे. घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार आमदार अपात्र होतील, हे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट आहे. जर अपात्रतेचा निर्णय झाला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. अपात्रतेचा निर्णय १० ऑगस्टपर्यंत घ्यावयाचा आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोळा आमदार अपात्र होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदही रिक्त होऊ शकते. अपात्र आमदारांवरील कारवाईची पूर्वतयारी म्हणजेच आजचा राजकीय भूकंप आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.