सांगलीतील आठवडा बाजारातून पर्समधील मंगळसुत्र लंपास
सांगली : खरा पंचनामा
शहरातील आठवडा बाजारातून महिलेच्या पर्समधील अडीच तोळ्याचे मंगळसुत्र आणि रोकड लंपास करण्यात आली. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
मनाली संदीप शहा (४८) यांनी फिर्याद दिली आहे. मनाली शहा या मूळच्या मसुर (ता. कराड, जि. सातारा) येथे राहतात. त्यांच्या भावाची पत्नी आजारी असल्याने त्या चार दिवसापुर्वी मिरजेतील चंदनवाडी येथे आल्या होत्या. शहा या आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास त्या बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पर्समधील छोटी पर्स चोरून नेली. चोरीचा घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली. त्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.