मी माझे कोणतेही शब्द मागे घेत नाही!
बीड : खरा पंचनामा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपले लक्ष महाराष्ट्रात केंद्रित केले आहे. राज्यात राव यांच्या बीआरएस पक्षाच्या एकापाठोपाठ एक सभा होत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी पंढरपूरमध्ये आपले संपूर्ण मंत्रिमंडळ आणून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, यावर पंकजा मुंडे मौन बाळगल्याने अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते. अखेर या चर्चेवर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणतेही शब्द मागे घेत नाही असे वक्तव्य त्यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे त्या बीआरएस पक्षाच्या वाटेवर आहेत का अशीही चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात त्या काय निर्णय घेतात याकडे राजकीय नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.