Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रक-दुचाकीच्या धडकेत मिरजेतील तरुण जागीच ठार!

ट्रक-दुचाकीच्या धडकेत मिरजेतील तरुण जागीच ठार! 



राधानगरी : खरा पंचनामा 

राधानगरी- निपाणी मार्गावरील राधानगरी तालुक्यातील गैबीघाट येथे झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत मिरज तालुक्यातील तरुण ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. 

हरिश्चंद्र भास्कर रणदिवे (वय२७, रा.शिंदेवाडी ता.मिरज जि.सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर महेश विलास रणदिवे (वय ३०) गंभीर जखमी झाला आहे. मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथील आठ ते दहा युवक सोमवारी सकाळी आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामाच्या दर्शनासाठी निघाले होते ते दुपारी दोन वाजता बाळुमामांचे दर्शन करुन राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी येथील धबधबा पाहण्यासाठी निघाले असता.

यावेळी हे गैबीघाट येथे दोघेजण लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव वेगाने चिराची वहातुक करणाऱ्या ट्रकने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्यानंतर हरिश्चंद्र रणदिवे याचा डोक्याचा व छातीचा चेंदामेंदा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर महेश रणदिवे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. 

रात्री उशिरा शवविच्छेदन करून म्रुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली असून ट्रकचालकाला अटक करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.