Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कॅबिनेट मंत्र्यांना राज्यमंत्र्यांचे बंगले वाटप : राष्ट्रवादीत नाराजी

कॅबिनेट मंत्र्यांना राज्यमंत्र्यांचे बंगले वाटप : राष्ट्रवादीत नाराजी 



मुंबई : खरा पंचनामा 

भाजप शिवसेना युतीमध्ये राष्ट्रवादीचे नऊ मंत्री सत्तेत सहभागी झाले खरे मात्र बारा दिवस उलटून गेल्यानंतर ही खातेवाटप झालेलं नाही. खाते वाटप झालं नसलं तरी मंत्र्यांना दालन आणि निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, ज्या मंत्र्यांनी वर्षानुवर्ष मंत्री पद भूषवली त्या मंत्र्यांना राज्यमंत्री दर्जाची निवासस्थाने देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. 

त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. राज्याच्या राजकारणामध्ये सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या नेत्यांपैकी आणि जास्तीत जास्त मंत्रीपद भूषवलेल्या मंत्र्यांपैकी राष्ट्रवादीमध्ये अनेक नेत्यांची नावे अग्रगण्य पाहायला मिळतात. उपमुख्यमंत्री पद भूषवलेले छगन भुजबळ अनेक महत्त्वाची मंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्ष पद भूषवलेले दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या सर्वांची नावे घेतली जातात. मात्र, भाजप-शिवसेनेच्या युतीत सहभागी झाल्यानंतर याच मंत्र्यांची कुचंबना होत असून नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. 

मंत्रिपदाची शपथ घेऊन बारा दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही खाते वाटप झालेलं नाही. तर दुसरीकडे मात्र शिवसेना- भाजपचे मंत्री राज्याचा गाडा जोरदारपणे हाकताना दिसत आहेत. मंत्रिमंडळाचे खाते वाटप झालेले नाही. त्यामुळे कुठलं खातं कोणाच्या वाटेला येईल. याची या मंत्र्यांना धाकधूक आहे. मात्र याच खातेवाटपाच्या आधी मंत्र्यांना वाटप झालेली निवासस्थान आणि दालने यावरुन नाराजी पाहायला मिळत आहे. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री किंवा कमी महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्र्यांना जी निवासस्थानी दिली होती. ती आता आता राष्ट्रवादीच्या टॉपच्या मंत्र्यांना दिल्याने नाराजी वाढताना पाहायला मिळते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.