Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नो एंट्रीमध्ये गाडी घातली : आयकर उपायुक्तांची पोलिसांशी हुज्जत!

नो एंट्रीमध्ये गाडी घातली : आयकर उपायुक्तांची पोलिसांशी हुज्जत! 



कल्याण : खरा पंचनामा 

नो एन्ट्रीमध्ये गाडी घातली म्हणून अडवून लायसन्स विचारल्याने भररस्त्यात आयकर उपायुक्त आणि वाहतूक पोलिसात जुंपल्याची घटना कल्याण स्टेशन परिसरात घडली. या प्रकरणावरुन तब्बल एक तास रस्त्यात गोंधळ सुरु होता. 

याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी ऑनलाईन दंड आकारुन आयकर उपायुक्ताविरोधात कारवाईचा रिपोर्ट पाठवला आहे. तर आयकर उपायुक्तानेही उद्धट बोलल्याचा आरोप करत वाहतूक पोलिसाविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाकडून फुले चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता वन वे केला आहे. 

याच रस्त्याने आयकर विभागाचे उपायुक्त धिरेन कुमार नो एन्ट्रीमधून आपली गाडी घेऊन येत होते. यावेळी कल्याण स्टेशनला दीपक हॉटेलजवळ कार्यरत असलेल्या डी. बी. पुंड नावाचे वाहतूक पोलीस यांनी त्यांना अडवले. पुंड यांनी धिरेन कुमार यांच्याकडे लायसन्स आणि गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. यामुळे चिडलेल्या धिरेन कुमार यांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत गोंधळ घालण्यास सुरवात केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.