तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलिस उपनिरीक्षकाचा अत्याचार!
अहमदनगर : खरा पंचनामा
पोलीस उपनिरीक्षकानेच तक्रार देण्यासाठी आलेल्या एका महिलेवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाहेडा असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. संशयित सध्या पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जमीन खरेदीत फसवणूक झाल्याप्रकरणी महिलेनं राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच सज्जनकुमार नाहेडा याने अनेकदा त्रास दिल्याचा आरोप महिलेनं केला आहे.
तू खुप छान दिसते, माझ्याशी मैत्री कर, असे मेसेज तो महिलेला पाठवत असे. इतकंच नाही तर त्याने घरी येऊन मुलासमोर महिलेला अत्याचार करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. महिलेला स्वतःच्या रूमवर नेलं आणि रूमवर नेत तिच्यावर जबरदस्ती केली, अशी माहिती पीडित महिलेनं दिली आहे.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कलम 376 क (ब), कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पोलिस उपनिरीक्षक सध्या पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.