रोहित पवार यांच्या कार्यालयातील साहित्य पेटवले!
पुणे : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील हडपसर परिसरात सृजन हे कार्यालय आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री दोन वाजता दोन जणांनी घुसखोरी केली. त्यांच्याकडून कार्यालयातील साहित्य पेटवण्यात आले. तसेच कार्यालयाला काळे फासण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत असल्याने हा धक्कादायक प्रकार घडला का ? अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. दरम्यान या घटनेबाबत रोहित पवार यांच्याकडून अजून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.
आमदार रोहित पवार यांनी लोणावळा येथील एक फोटो शुक्रवारी ट्विट केला. त्या ट्विटच्या माध्यमातून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटावर निशाणा साधला होता. भारतीय जनता पक्षानेही राजकारणासाठी चुकीचा मार्ग निवडला असल्याचे त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्या ट्विटची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर काही जणांनी रोहित पवार यांना ट्रोलही केले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.