Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खाते वाटप होणार पण मंत्रिमंडळ विस्तार नंतर!

खाते वाटप होणार पण मंत्रिमंडळ विस्तार नंतर!



मुंबई : खरा पंचनामा

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन जवळपास १० दिवसांचा काळ उलटला. मात्र, अद्यापही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. अशातच खातेवाटप आणि राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे. सगळ्यात पक्षातील नेते विस्ताराकडे लक्ष लावून बसले आहेत. अजित पवार गटाचे रखडलेले खाते वाटप अधिवेशनाआधी मार्गी लागण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काल बुधवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याची माहीती आहे.

या चर्चानंतर राज्याचं अर्थखातं राष्ट्रवादीकडे येईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर खाते वाटपवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता दोन गट निर्माण झाले आहेत तर याबाबतची न्यायालयीन लढाई राष्ट्रवादीला लढावी लागणार आहे, यासंबधी चर्चा अमित शाह यांच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे. 

तर राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथ घेतल्यापासून त्यांना कोणती खाती मिळणार याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अर्थखात मिळण्याबाबत राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती आहे. अजित पवार आणि अमित शाह यांच्या बैठकीत अजित पवार यांनी याबाबत चर्चा केली असून भाजप राष्ट्रवादीला अर्थखात देण्यास तयार आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.