Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माधवनगरमध्ये डोंगरे गटाला धक्का : महिलेचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द! तिसऱ्या अपत्यामुळे जिल्हाधिकार्‍यांची कारवाई

माधवनगरमध्ये डोंगरे गटाला धक्का : महिलेचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द!
तिसऱ्या अपत्यामुळे जिल्हाधिकार्‍यांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील माधवनगर येथील पूनम गजानन होनवार यांनी तिसरे अपत्य असल्याची माहिती लपविल्याबद्दल त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी रद्द केले. या कारवाईमुळे शिवाजी डोंगरे गटाला धक्का बसला आहे.

माधवनगरच्या वॉर्ड क्रमांक पाचमधून पूनम होनवार निवडून आल्या होत्या. त्यांच्या विरोधात याच प्रभागातील प्रतिस्पर्धी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख रेखा रामचंद्र शेंडे यांनी निवडणूक लढविली होती. निकालानंतर शेंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे होनवार यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 14 (1)मधील खंड (ज-1)नुसार तीन अपत्य असल्याची तक्रार केली होती.
या तक्रार अर्जावर तीन सुनावण्या घेण्यात आल्या. 

तक्रारीबरोबरच पूरक कागदपत्रे रेखा शेंडे यांनी सादर केली होती. त्या कागदपत्रानुसार व दाखल अपीलानुसार होनवार यांनी तिसरे अपत्य असल्याची माहिती लपविल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना अपात्र घोषित केले. यासाठी शिवसेना व स्थानिक माधवनगर विकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. होनवार यांना निकालाविरोधात पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील करता येणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.