Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महानगपालिकेतर्फे बचावासाठी घरगुती उपाययोजनांची प्रात्यक्षिके!

महानगपालिकेतर्फे बचावासाठी घरगुती उपाययोजनांची प्रात्यक्षिके!



सांगली : खरा पंचनामा

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगपालिकेच्या वतीने संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बचावासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती आणि प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटनेत्या भारती दिगडे यांच्या उपस्थितीत प्रभाग 14 मधील गणपती मंदिरासमोर ही प्रात्यक्षिके झाली. 

यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी आणि टीमकडून ही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये पाणी वाढले तर रिकाम्या बाटल्यांचा सहाय्याने तसेच घरगुती कॅनच्या मदतीने सुरक्षितपणे कसे बाहेर पडता येईल याबाबतची माहिती देऊन प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. 

यावेळी स्थानिक नगरसेविका उर्मिला बेलवलकर, उदय बेलवलकर, मोहन जामदार यांच्यासह स्थानिक नागरिक आणि अग्निशमन जवान उपस्थितीत होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.