Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

केवळ भुजबळच नाही तर अजितदादा, धनंजय मुंडेही रडारवर!

केवळ भुजबळच नाही तर अजितदादा, धनंजय मुंडेही रडारवर!



पुणे : खरा पंचनामा

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर भुजबळ यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. भुजबळ यांना धमकी देणाऱ्याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.

त्यावेळी धक्कादायक खुलासा आरोपीने केला आहे. आरोपीने पोलिसांच्या चौकशीत दिलेल्या माहितीनुसार फक्त छगन भुजबळच नाही तर आणखी काही बडे नेते रडारवर होते. अजित पवार, धनंजय मुंडे यांनाही जीवे मारण्याचा धमक्या दिल्या होत्या.

मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली होती. दरम्यान धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं नाव प्रशांत पाटील असून, तो कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रशांत पाटीलनं मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याचंही प्राथमिक तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.