अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार मगच खाते वाटप!
मुंबई : खरा पंचनामा
अजित पवार यांच्या शपथविधीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस पवार सरकार स्थापन झालं. पण त्यानंतर दुसरा अंक रंगला तो, मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यावरुन नाराजीनाट्याचा. पण यावरही मार्ग काढत आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय शिंदे - फडणवीस - पवार सरकारनं घेतला आहे.
अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस आहे.
पुढील 48 तासांत नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीला आठवडा उलटला असला तरीदेखील राष्ट्रवादीचे मंत्री अद्याप खात्याशिवायच आहेत.
साधारणतः आठवडाभरापूर्वी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर 8 आमदारांनीही शरद पवारांची साथ सोडत मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजुनही त्यांचं खातेवाटप झालेलं नाही.
तसेच, शिंदे गटातील इतर काही आमदारही अद्याप मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. अजित पवारांच्या शपथविधीपूर्वी शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रीपदाचे दावे केले होते. अशातच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या एक ते दोन दिवसांत आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. त्यानंतरच राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या मंत्र्यांचं खातेवाटप केलं जाईल, असे सांगण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.