Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अखेर खाते वाटप झाले : अजित पवार अर्थमंत्री!

अखेर खाते वाटप झाले : अजित पवार अर्थमंत्री!





मुंबई : खरा पंचनामा

मागील काही दिवसांपासून रखडलेला मंत्रीमंडळ खातेवाटप अखेर आज झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यपाल रमेश बैस यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या परवानगीने खातेवाटप प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्याकडील काही खाती काढण्यात आली आहे. मागील आठवडाभरापासून खातेवाटपाबाबत चर्चा सुरु होती. अजित पवार त्यासाठी दिल्लीलाही गेले होते. अखेर गुरुवारी रात्री तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर खातेवापटावर शिक्कामोर्तब झाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन, संजय बनसोडे  क्रीडा, आदिती तटकरे महिला बालविकास मंत्रालय, छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा, धर्मरावबाबा आत्रम अन्न व औषध पुरवठा, हसन मुश्रीफ वैदकीय शिक्षण, अनिल पाटील मदत पुनर्वसन, दिलीप वळसे पाटील सहकार, धनजंय मुंडे - कृषी खाते

एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला कृषी, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही 3 खाती देण्यात आली आहेत. तर भाजपकडून अर्थ, सहकार, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा, क्रीडा, महिला आणि बालकल्याण ही खाती देण्यात आली आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.