दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणाऱ्यास रत्नागिरीतून अटक
रत्नागिरी : खरा पंचनामा
पुण्यातील कोथरूड येथून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांना कोंढव्यात आश्रय देण्यासाठी आर्थिक पुरवठा करणाऱ्या रत्नागिरी येथील एकाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी दोन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर एटीएसने आता ही कारवाई केली आहे.
पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी पहाटे पुणे शहरातील कोथरुड परिसरातून मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी (वय 24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना पकडले होते. तर मोहम्मद शहनवाज आलम (वय 31) फरार झाला आहे. आरोपींना पुण्यात आल्यानंतर आश्रय देण्यासाठी त्यांची मदत करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.