बॅनरवर पवार साहेबांचा फोटो लावा!
मुंबई : खरा पंचनामा
रविवारी दुपारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एक मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांनी बंड करत भाजप, शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत सरकारमध्ये प्रवेश केला आहे.
आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. त्याचबरोबर, महाराष्ट्रात आता शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी, अशी नवी युती असणार आहे. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.
शपथ घेतल्यानंतर राज्यभरात अजित पवारांसह 8 मंत्र्यांचे बॅनर झळकत आहेत.
रविवारी झालेल्या राजकीय नाट्यानंतर अजित पवार यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना पोस्टर लावताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो लावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात काही ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर लागले आहेत. त्यावर शरद पवार यांचा फोटो नसल्यामुळे टीका होताना दिसत आहे. त्यामुळे आता पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो असावा, अशी सूचना अजित पवार यांनी केल्याची माहिती आहे.
राज्यात कुठेही पोस्टर लावणार असाल तर त्यावर शरद पवार यांचा फोटो लावण्याचे आदेश अजित पवार यांनी दिल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील आपल्या सोबत असल्याचा दावा अजित पवार या गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शपथ घेतलेल्या आमदारांची बैठक सकाळी देवगिरी बंगल्यावर घेण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.