Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोयना धरणातून विसर्ग वाढणार : नदीकाठच्या गावांना इशारा!

कोयना धरणातून विसर्ग वाढणार : नदीकाठच्या गावांना इशारा!



सातारा : खरा पंचनामा

कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असून २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १८९ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर धरणातील साठा ६४ टीएमसी झाला असून पायथा वीजगृहातील विसर्ग १०५० क्यूसेकने वाढणार आहे.

त्यामुळे गुरुवारी सायंकाळपासून २१०० क्यूसेक विसर्ग होणार असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील १२ दिवसांपासून संततधार आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरला दररोज १०० ते २०० मिलीमीटरच्या अंतरात पाऊस पडत आहे. तसेच कास, बामणोली, तापोळा येथेही संततधार आहे. यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्याचबरोबर धोम, कण्हेर, तारळी, उरमोडी, बलकवडी धरणक्षेत्रातही पावसाचा जोर आहे. त्यामुळे ही धरणे ६० टक्क्यांहून अधिक भरली आहेत.

त्यातच तारळी धरणही ८५ टक्के भरलेले असल्याने विसर्ग करावा लागणार आहे. तर बलकवडी धरण भरल्याच जमा असून विसर्ग करण्यात येत आहे. विसर्गाचे हे पाणी धोममध्ये येत आहे. त्यामुळे धोम धरणातील पाणीसाठाही झपाट्याने वाढत चालला आहे. त्यातच पावसाचा जोर कायम राहिल्यास धोममधूनही पाणी सोडल्यास पाणीपातळीत वाढ होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.