पत्नीचा खून करणा-यास जन्मठेपेची शिक्षा
सांगली : खरा पंचनामा
शहरातील संजयनगर येथे किरकोळ कारणावरून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व अति सत्र न्यायाधीशस श्री. आर. के. मलाबादे यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. सरकापक्षातर्फे अति, जिल्हा सरकारी वकील एम. एच. ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले.
मारुती रामचंद्र कोळपे (रा. डोर्ली, ता. जत, जि. सांगली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास ०१ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.
दि. २२ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी १२.३० ते एकच्या दरम्यान पती-पत्नी संजयनगर येथील घरी होते. पत्नीने पतीला मला नागीन झाली आहे मला फार त्रास होत आहे, असे सांगितले. त्यावेळी पतीने तिला शिवीगाळ करुन खोलीतील स्टोव्हचे टाकीचे टोपन काढून स्टोव्हीमधील रॉकेल पत्नीच्या अंगावर ओतले. सांगली सिव्हील हॉस्पीटल येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
त्यानंतर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याचा तपास पोलीस निरीक्षक पी. डी. जाधव यांनी केला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा, फिर्यादीचा जबाब, इतर साक्षीदारांचे तपास टिपणे नोंदवून जिल्हा न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. याकामी एकूण ०८ साक्षीदार तपासण्यात आले. सदर साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने शिक्षा ठोठावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.