Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दिवाळीनंतर जाणारे अजितदादा, त्यामुळे आताच गेले!

दिवाळीनंतर जाणारे अजितदादा, त्यामुळे आताच गेले!



मुंबई : खरा पंचनामा

अजित पवार सरकारमध्ये दिवाळी नंतर सहभागी होणार होते तसेच महाविकास आघाडी अधिक मजबूत होत असल्यामुळं सरकारमध्ये सहभागी होण्याचा आधी निर्णय अजित पवार यांनी घेतला. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा याला विरोध असल्याने अजित पवार यांनी तातडीने निर्णय घेतला, असे वृत्त एका वृत्तवाहिनेने दिले आहे.

शरद पवार यांनाही एनडीएच्या बैठकीला आणण्याचे प्रयत्न सुरू होते, पण शरद पवार यांचा मात्र त्याला विरोध होता. काल दिल्लीत झालेल्या बैठकीसाठी शरद पवार यांना बोलावलं देखील होतं पण त्यांनी येण्यास नकार दिला.

2 दिवस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटून मनधरणी करत होते, पण पवार मात्र विरोधावर ठाम होते. राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू होत्या. या सभांना मोठा प्रतिसाद मिळत होता.

या महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार महाराष्ट्रातील एनडीए सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने विरोधी पक्षांच्या बैठकीतील पवारांचासह महत्त्वाचा आहे.

विशेष म्हणजे, 82 वर्षीय पवार यांच्याकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील प्रमुख ते म्हणून पाहिले जात आहे. अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांची वायबी सेंटर येथे भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, आम्ही शरद पवार यांना पक्षात फूट पडू नये, अशी विनंती केल्याचं सांगितलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.